
परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर ची बैठक शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथील पार पडली या बैठकीत दारू व्यसनमुक्ती वर जनजागृती पर मेळावे,रॅली,संदेश पत्रक इत्यादी होणाऱ्या कार्यक्रमांसोब नुकत्याच दिलेल्या ओबीसी समाजाच्या 27 टक्के आरक्षणात मराठा कुणबी समाजाचे आरक्षण जोडून त्याला मंजुरी दिली या विषयावर चर्चा झाली.ओबीसी समाजावर हा अन्याय असून पहिलेच ओबीसी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हा समाज जास्तीत जास्त मागासलेला समाज आहे. या समाजात मध्यमवर्गीय व गरीब व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शासनाचे जे पूर्वी पासून चालत आलेले 27 टक्के आरक्षण या समाजाच्या संख्येनुसार कमी असून त्यानुसार येथील समाजाला आरक्षण चा फायदा फारच कमी होतो.आता मराठा कुणबी हा समाज या आरक्षणात समाविष्ट केल्याने ओबीसी समाजावर हा अन्याय झाला असून मराठा कुणबी या संख्येची भर पडल्यामुळे हा समाज अजून मागासलेपणाकडे जाईल सरकारला तसेच महाराष्ट्र शासनाला या बैठकीच्या माध्यमातून संघटनेच्या ओबीसी बांधवाकडून विनंती करण्यात येत आहे की,मराठा कुणबी या आरक्षणाला दिलेले मंजुरी तात्काळ मधील रद्द करावी असे बैठकीत एकमताने ठरवण्यात आले. तसेच लगेच बैठकीनंतर माननीय. मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडवणीस यांना मा.जिल्हाधिकारी साहेब विनयजी गोडा यांच्याकडे वरील प्रमाणे मागणीचे निवेदन सोपवण्यात आले.यावेळी परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर ओबीसी समाज बांधव श्री.अनिल डोंगरे जिल्हाध्यक्ष श्री.भाऊराव ठाकरे प्रदेश सल्लागार श्री.लक्ष्मीकांत धानोरकर जिल्हा उपाध्यक्ष श्री.दिगंबर वासेकर जिल्हा संघटक श्री.आकाश क्षीरसागर जिल्हा कोषाध्यक्ष श्रीमती प्रिया बुटले श्री.श्रीकृष्ण पिंपळकर श्री मारुती वाकुलकर श्री.गौरव चापले श्री.राजू लडके श्री.प्रदीप जवादे श्री.अशोक ठाकरे श्री. प्रशांत जबाडे श्री.भाऊजी चापले श्री.नामदेव ढोले यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.