

नागपूर(Nagpur):भाजपचे वर्धा येथील खासदार आणि या निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांची उमेदवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांनीच रद्द करावी अशी मागणी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रपरिषदेत केली. रामदास तडस यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात असलेली त्यांची सून पूजा तडस यांच्यावरील अन्यायाचा संदर्भ देत त्यांनी ही मागणी केली. आपल्याला 17 महिन्यांचे बाळ असताना पती पंकज तडस यांना घरी ठेवून घेत
आपल्याला घराबाहेर काढले, खोटे लग्न लावले, एका फ्लॅटवर ठेवले,अनन्वित अत्याचार केल्याचा आरोप पूजा तडस यांनी यावेळी केला. दरम्यान, हा सर्व निवडणूकीचे तोंडावर विरोधकांचे आपल्याविरोधात षडयंत्र आहे. आपल्या मुलाला फसवत त्याच्या हत्येचा डाव रचला,याविषयीची ऑडीओ क्लिप असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना विकासाच्या बाबतीत मुद्दे नसल्याने विरोधक तिला हाताशी धरत आपल्याला खंडणी मागत हे आरोप करीत आहेत असा आरोप माध्यमांशी बोलताना केला.
हनी ट्रपचे आरोप तडस कुटुंबिय करीत असून सातत्याने पूजा तडसवर अन्याय करत आहेत असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.