Camp : संस्कृत संभाषण शिबिराचा थाटात समारोप

0

नागपूर(Nagpur), 19 जून :- संस्कृत भारती महानगर नागपूर आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहा दिवसीय संस्कृत संभाषण शिबिराचा समारोपीय कार्यक्रम बुधवारी हिंदू मुलींची शाळा महाल येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्‍हणून मोहिते नगरचे संघचालक सुधीर दप्तरी, विशेष अतिथी स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस, संस्कृत भारतीच्या बाल केंद्रप्रमुख रेखा गोथे यांची उपस्‍थ‍िती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्‍थानी हिंदू मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका माया बमनोटे होत्‍या.

रिता अयाचित, श्री देशकर यांच्या मार्गदर्शनात हिंदू मुलींची शाळा येथे आयोजित या शिबिरात विविध वयोगटातील 50 विद्यार्थ्यांनी सहलाभ घेतला. विद्यार्थ्यांना अथर्व भारद्वाज, राजरी धाबले यांचेही मार्गदर्शन लाभले. समारोपीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेतून गीत, संभाषण, नाट्य सादरीकरण केले. याप्रसंगी मार्गदर्शक शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी अश्विनी पिंपळापुरे, अनघा पेंडके, मीना मेनजोगे यांचे सहकार्य लाभले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व संस्कृत भाषेचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाला विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राजरी धाबले यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. कविता जोशी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने झाली.