विदर्भ साहित्य संघाच्यावतीने ग.त्र्यं. माडखोलकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन शनिवार, १६ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजता अमेय दालन, विदर्भ साहित्य संघाचे सांस्कृतिक संकुल, चौथा मजला, झांशी राणी चौक, सीताबर्डी येथे करण्यात आले आहे.
सुप्रसिद्ध विचारवंत व व्याख्याते मा. श्री. भानू काळे हे “बदलता भारत” या विषयावर आपले विचार मांडतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मा. श्री. प्रदीप दाते राहणार आहेत. सर्वानी या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारी मंडळाने केले आहे.
Related posts:
थॅलेसिमिया ग्रस्त मुलीला जीवनदान : वाढदिवशी ७५ वे रक्तदान करून समाजसेवेची दिली अनोखी भेट
November 1, 2025LOCAL NEWS
स्थानिक गुन्हे शाखेची हॉटेल ताडोबा अतिथी इन लोहारा येथे चालवीत असलेल्या कुंटणखान्यावर धाड
November 1, 2025LOCAL NEWS
शहरातील रस्त्यांचे सिमेंटिकरण करा : वीर अशोक सम्राट संघटनेचे मुख्याधिकारी यांना निवेदन
November 1, 2025LOCAL NEWS


















