पोलिस विभाग व मैत्री परिवार संस्थेतर्फे पोलिस मुख्यालय परिसरात वृक्षारोपण 

0

नागपूर, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि हरित नगरीच्या दिशेने पाऊल टाकण्याच्या निर्धाराने नागपुरातील मैत्री परिवार संस्था व पोलिस आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी पोलिस मुख्यालय परिसरात वृक्षारोपण पार पडले.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, सह पोलिस आयुक्त अश्वती दोरजे, गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त संजय पाटील, अप्पर पोलिस आयुक्त विपिन शेवाळे, अप्पर पोलिस आयुक्त डॉ शिवाजी राठोड, पोलिस उपायुक्त निमित्त गोयल, पोलिस उपायुक्त निकेतन कदम परिमंडळ, पोलिस उपायुक्त डॉ.अश्विनी पाटील, पोलिस उपायुक्त राहुल मदने, वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त शशिकांत सातव, राखीव पोलीस निरीक्षक विनोद तिवारी, मैत्री परिवार संस्थेचे चंदूजी पेंडके, प्रमोदजी पेंडके, गिरी साहेब, प्रकाश रथकंठीवार, अरविंद पाटील, विजय जथे, निरंजन वासेकर, संजय मार्कंडे, दिलीप ठाकरे, विवेक देशकर, आनंद टोळ, प्रविण पंडे, विशंभर पसारकर, डॉ शरद सूर्यवंशी, अनिल यावलकर, माधुरी यावलकर, सुनील कुहीकर, सुनील जैस्वाल, नितीन पटवर्धन, कृष्णा डेहनकर, येरपुडे, पुष्कर रथकंठीवार उपस्थित होते.

या प्रसंगी मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमात विविध प्रकारची झाडं लावण्यात आली. ज्यामुळे नागपूर शहराला हरीत नगरी बनविण्यात मदत होईल. सदर कार्यक्रमात पर्यावरणाच्या रक्षणासाठी आवश्यक असलेल्या विविध गोष्टींवर प्रकर्षाने चर्चा झाली. या उपक्रमाकरिता नागपुरातील 42 पोलिस ठाण्यांकरीता मैत्री परिवार संस्थेने विविध प्रकारची 300 झाडं पोलिस विभागाला उपलब्ध करून दिली. त्या सर्वांची लागवड केली जाणार आहे.