बैलगाड्या आडव्या घालून शेतकऱ्यांनी केली गावबंदी!

0

 

 

 चंद्रपूर – जिल्ह्यातील वरोरा शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असणारे मांगली- तुंमगाव मागील कित्येक वर्षापासून शासकीय योजनेपासून आणि मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. शासनाला बरेचदा मागण्या निवेदन सादर केले परंतु कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून या गावात शासकीय अधिकाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. प्रवेश मार्गाच्या मधोमध बैलगाड्या आडव्या करून शासकीय अधिकाऱ्यांना बंदी घातली आहे. यावेळी गावातील जनतेने “शासन मुर्दाबाद शेतकरी जिंदाबाद,” कामचुकार अधिकाऱ्यांचा निषेध असो. पाझरबोडी तलाव झालाच पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे., असे अनेक नारे देत रस्ता अडवून धरला. यावेळी शासकीय यंत्रणेला गावातील लोक काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करत आहे.

गावकऱ्यांनी शासनाला आपल्या मागण्या सादर केले आहे जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत गाव बंदी उठणार नाही असा निर्णय या गावकऱ्यांनी घेतला आहे. जलसंधारण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे तूमगाव मधील 30 ते 40  वर्षापासून अपूर्ण बांधकाम झालेले पाझर तलावा मुळे  अंदाजे १५० एकर जमीन दरवर्षी पुरबुडी  मध्ये जाते आहे. याची दखल अजून पर्यंत सरकारने घेतली नाही. याशिवाय सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोग आल्याने शेतकऱ्याची नुकसान भरपाई अजून पर्यंत सरकारने दिली नाही. शासन द्वारा   राबविण्यात येणारी प्रधानमंत्री पीक विमा योजना पासून ९०%शेतकरी अजूनही वंचित आहेत. गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे परंतु अजूनही  कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही. यंत्रणा अशीच उदासीन राहिल्यास  येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत गावकरी बहिष्कार टाकणार अशी माहिती त्यांनी दिली आहे.

राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू | Rajgira Pithache Laadoo | Shankhnaad News #shankhnaadnews #live