

टेक-नेक्स्ट असोसिएशनचे शतकी सत्र
नागपूर (Nagpur) 14 ऑगस्ट 2024 :- टेक-नेक्स्ट असोसिएशनच्या ऐतिहासिक शतकी सत्राच्या निमित्ताने रविवार, 18 ऑगस्ट, 2024 रोजी प्रसिद्ध लेखक, उद्योग, एल अँड टी टेक्नॉलॉजीचे सर्व्हिसेस, सिंटेल आणि पाटनी काम्प्युटर सिस्टीमचे माजी सीईओ अच्युत गोडबोले (Achyut Godbole) यांचे ‘एआय: इनोव्हेशन, इम्पॅक्ट आणि फ्युचर पर्स्पेक्टिव” विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. टॅमरिंड, हॉल, चिटणवीस सेंटर येथे सकाळी 11 वाजता हे व्याख्यान होईल. या नि:शुल्क व्याख्यानात अच्युत गोडबोले कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झपाट्याने विकसित होत असलेल्या क्षेत्रात कौशल्य आणि अंतर्दृष्टी संदर्भात विचार व्यक्त करणार आहेत.
या सत्राचे प्रकल्प संचालक महेंद्र गिरीधर आणि मॉडरेटर म्हणून मिली जुनेजा राहतील. आरके टेक्नो कन्सल्टंट्स प्रा. लि., पल्स सिस्टम्स, श्री नित्या, पीएसएटीलिंक सर्व्हिसेस, सार एज्युकेशन (आय) प्रा. लि. रेड अलर्ट सेक्युरिटी सिस्टीम, एसजी एम्बेडेड सोल्युशन्स आणि साबू होममेकर यांचे उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभत आहे.
अधिक माहितीसाठी www.tech-nxt.org या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा डॉ. विशाल लिचडे-8237732800, अभिनय ढोबळे-9890127120, हेमंत झुंजूरकर-9834074692 यांच्याशी संपर्क साधावा .