


दृष्टीहिन उद्योजक डॉ. भावेश भाटिया यांचे 2 जून रोजी व्याख्यान
नागपुर(Nagpur), सनराईज कँडल्सचे संस्थापक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते दृष्टीहिन उद्योजक डॉ. भावेश भाटिया(Dr. Bhavesh Bhatia) यांचे रविवार, 2 जून 2024 रेाजी होटल तुली इंपीरियल, रामदासपेठ येथे सकाळी 9.30 वाजता जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यंग इंडिया बिझनेस क्लब द्वारे आयोजित एक दिवसीय ‘बिझनेस ग्रोथ कॉन्क्लेव्ह’ मध्ये हे व्याख्यान होणार आहे.
डॉ. भावेश भाटिया यांनी सनराईज कँडल्स या मेणबत्ती तयार करण्याच्या उद्योगाद्वारे अनेक दृष्टीहिन लोकांच्या जीवनात प्रकाश आणला आहे. 14 राज्यांमधील सुमारे चार हजार दृष्टीहिन लोक त्यांच्या कारखान्यात मेणबत्ती तयार करण्याचे काम करतात. दृष्टीहिनांसाठी कौशल्य विकास केंद्र ते चालवतात. डॉ. भावेश यांनी पॅरालिम्पिक खेळांमध्ये अनेक पदके पटकावली असून त्यांना राष्ट्रपती पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उद्योग भूषण पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
‘रुक जाना नहीं’ हे पुस्तक त्यांनी लिहिले असून त्यांच्या जीवनावर विविध लघुचित्रपट निर्माण करण्यात आले आहेत.
या एक दिवसीय कॉन्क्लेवमध्ये प्लास्टो इंडस्ट्रीजचे संचालक विशाल अग्रवाल, माजी महापौर दयाशंकर तिवारी, राम कूलर्सचे संचालक राकेश आवचट यांचादेखील सहभाग राहणार आहे. कॉन्क्लेव्हमध्ये आयोजित कार्यशाळेत सोशल मिडीया मार्केटिंगवर पल्लवी बारस्के, पर्सनल ब्रँडिगवर स्नेहा टावरी तर स्ट्रैटेजिक ब्रांड बिल्डिंग वर तेजस्विनी भांडारकर यांचे मार्गदर्शन प्राप्त होणार आहे.
या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्लब चेअरमन रमाकांत खेतान, संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अॅड. देवेंद्र अग्रवाल, संचालक विवेक मंत्री, ब्रिजमोहन चितलांगे, डॉ. दीपक केळकर, डॉ. अभय पाटील, निकेश गुप्ता, सिद्धार्थ रूहाटिया, शार्दुल दिगंबर, चंद्रकुमार जाजोदिया उर्फ लप्पी सेठ, विदुर शर्मा, हरेश लखानी, दिपाली देशपांडे, सीए तृप्ती पंड्या यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमित अग्रवाल, साकेत चौरसिया, अमितराव खजांची, आर्कि. रवी चौधरी, डॉ. पूनम हूदिया, डॉ. निराली श्रीराव, कमल शर्मा, विशाल अग्रवाल, पंकज अग्रवाल, योगेश अग्रवाल, अभिषेक जेजानी, विनोद वादीचार, प्रसाद फसाटे, राज अग्रवाल, सतीश अग्रवाल, आशीष शिवाल, संदीप अग्रवाल, प्रिया टटेवार,विक्रम मेश्राम, जीतू लालवानी, अतुल हसनी,मनोज जैन,पंकज महस्के, जयदीप धंदे, मनोज बागड़ी, श्रीकांत दिगंबर, विजय वर्मा यांचे सहकार्य लाभत आहे.