न्यायधीशाच्या घरी चोरी; इतकी रक्कम पळवली

0

Chandrapur :  वरोरा न्यायालायचे ज्यूडीयल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास हे देशपांडे पेट्रोल पंप चे मागे चंद्रकांत पूर्ण पुसदेकर चे घरी वरच्या मजल्यावर कुटुंबासमवेत किरायाने राहत होते. 19 मे 2024 ला ते कुटुंबासह स्व गावी मिरज येथे गेले. घरी कोणी नाही याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा टाळा तोडून कपाटातील सोन्या चांदीचे अलंकार व रोकड लंपास केली. एकूण 62000 च्या वस्तूवर चोरट्यांनी हात मारला. 24 मेला सकाळी घरमालक जागे झाले तेव्हा न्यायाधीशांच्या घराचा टाळा तोडून दिसला आणि घटना उघडकीस आली. सदर चोरीची घटना 23 मे च्या रात्र दरम्यान घडली.

यामध्ये बारा ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा गोफ, किंमत 42 हजार रुपये, बदामी सोन्याचे टॉप्स चार ग्रॅम किंमत आठ हजार रुपये, चांदीची वाटी व पैजन किंमत दोन हजार रुपये, नगदी दहा हजार रुपये, नगदी दहा हजार रुपये, सौदी देशाची करन्सी पाचशे रुपयाच्या पाच नोटा, 200 च्या दोन नोटा, शंभर ची एक नोट, कपाटातील नगदी व दागिने असा एकूण 62 हजार रुपये चे सामान चोरी गेले. घटनेची माहिती घरमालकाने व्हिडिओ कॉल करून न्यायधीशांना सांगितली आहे.घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.