

नागपूर (NAGPUR ): ह्युमॅनिटी सोशल फाउंडेशन आणि निर्मल परिवारच्या वतीने महिला सक्षमीकरण आणि महिलांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षी काढण्यात येणारी भव्य बुलेट रॅली यंदा येत्या 10 मार्च 2024 रोजी अजनी रेल्वे पोलीस फोर्स (आरपीएफ) ग्राउंड येथून निघणार असल्याची माहिती ह्युमॅनिटी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष पूजा प्रमोद मानमोडे यांनी दिली.
दुपारी 2 वाजता: महिला दिन सोहळा उपक्रम प्रारंभ होईल. यात झुंबा डान्स, महिला नृत्य, महिलांचे स्टंट प्रात्यक्षिके आणि बुलेटस्वार होऊन महिला मैदानाला राउंड मारतील. दुपारी ४ वाजता प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दिली जाईल. त्यानंतर बुलेट रॅली अजनी पोलीस ग्राउंड येथून निघून, मेडिकल चौक, बैद्यनाथ चौक, जगनाडे चौक, नंदनवन मेन रोड चौक, तिरंगा चौक, गजानन चौक, सक्करदरा चौक, छोटा ताजबाग, अयोध्या नगर, तुकडोजी चौक येथून परत अजनी रेले पोलीस फोर्स ग्राउंड येथे येईल. सायंकाळी 6 वाजता बुलेट राणीचा राणींचा कौतुक सोहळा, बक्षीस वितरण, केक कटींग कार्यक्रम, आभार व समारोप होईल. यात या भव्य बुलेट रॅलीमध्ये सुमारे २०० महिला बुलेटस्वार होऊन सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.