वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा कचेरीसमोर लाक्षणिक धरणे आंदोलन

0

 

बुलढाणा BULDHANA : बहुजन समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव हत्याकांड लातूर जिल्ह्यातील रेणापुर येथील गिरीधर तपघाले अकोला येथील एका मुलीचा हत्याकांडांच्या पार्श्वभूमीवर ॲट्रॉसिटी कायदा अधिक कठोर करावा अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडी युवा संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.