
गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन
वर्धा (Wardha):- बोरगाव मेघे येथील टेकडी जिल्हा परिषदेच्या शाळेला सुरक्षा भिंत बांधण्यात यावी याकरिता 19 सप्टेंबर रोजी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेकडी येथील व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषदेला निवेदन द्वारे मागणी केली .मात्र अद्याप कारवाई झाली नसल्याने अंबिका सोशल फाउंडेशन च्या अध्यक्ष अंबिका हिंगमिरे यांना ही बाब लक्षात आणून दिली त्यांनी लगेच शाळेला भेट देऊन समस्या जाणून घेतली.
या शाळा टेकडी परिसरात असून शाळेला सुरक्षा भिंत नसल्याने मोकाट जनावरांचा तसेच रात्रीला अद्यापींचा मोठा हौदोष असल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे या शाळेत अत्यंत गरीब घरातील मुले या शाळेत शिक्षण घेतात. त्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी अंबिका हिंगमिरे प्रशासनाला पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तत्पूर्वी शाळेच्या मुख्याध्यापकांनी अंबिका हिंगमिरे यांचे स्वागत केले.
तसेच गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन शाळेला सुरक्षा भिंत उभारण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पाठपुरावा करण्याच्या मागणी केली.
शंखनाद न्यूज करीता
रविराज घुमे वर्धा