

Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman)यांनी आज बजेट सादर करताना शेतकरी, महिला आणि मजुर वर्गाला डोळ्यासमोर ठेऊन काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. महिला उद्योजिका घडवण्यासाठी सरकारने खरच काही चांगले निर्णय घेतले आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट मांडताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. यात शेतकरी क्रेडिट कार्डाची लिमिट वाढवली आहे. बिहारसाठी मखाना बोर्डची घोषणा केली आहे. कामगारांसाठी सुद्धा अनेक घोषणा केल्या आहेत. महिलांसाठी सुद्धा या बजेटमध्ये बरच काही आहे. या बजेटमध्ये महिला, शेतकरी आणि मजुरांसाठी,ज्येष्ठ नागरिकांसाठी काय आहे? ते जाणून घेऊया.
महिलांसाठी काय?
सरकार 10 हजार कोटी रुपयाचं योगदान देऊन स्टार्टअप्ससाठी फंडची व्यवस्था करेल. सरकार पहिल्यांदा पाच लाख महिला, एससी आणि एसटी उद्योजिका घडवण्यासाठी 2 कोटी रुपये कर्ज देईल.
महिलांना विना गॅरेंटी सहज अटींवर लोन मिळेल. जेणेकरुन त्यांना छोट्या आणि मध्यम आकाराचा व्यवसाय सुरु करता येईल. सरकारच्या या योजनेत महिलांना 5 वर्षांसाठी 2 कोटी रुपये टर्म लोनची सुविधा मिळेल. याचा 5 लाख महिलांना फायदा होईल.
महिलांना उद्योग वाढवण्यासाठी डिजिटल ट्रेनिंग, मार्केटिंग सपोर्ट आणि सरकारी योजनांची जोडण्याची संधी दिली जाईल.
शेतकऱ्यांसाठी काय?
बजेटमध्ये शेतकरी क्रेडिड लिमिट 3 लाखावरुन वाढवून 5 लाख करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, यूरिया उत्पादनात आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी सरकार बंद पडलेले 3 यूरिया प्लांट पुन्हा सुरु केलेत. यूरिया पुरवठा वाढवण्यासाठी आसामच्या नामरुप येथे 12.7 लाख मॅट्रिक टन वार्षिक क्षमतेचा प्लांट लावला जाईल.
कामगारांसाठी काय?
ऑनलाइन प्लेटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांना ई-श्रम पोर्टलवर रजिस्टर करुन ओळखपत्र देण्यात येईल. पीएम जन आरोग्य योजनेतंर्गत आरोग्य सुविधा दिली जाईल. जवळपास 1 कोटी गिग कामगारांना याचा लाभ मिळेल.
Budget 2025: ज्येष्ठ नागरिकांना बजेटमधून दिलासा, आता 1 लाखापर्यंतच्या रकमेला टॅक्स डिडक्शन
अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर करताना ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी बजेट २०२५ मध्ये ज्येष्ठ नागरिकांना टीडीएस लिमिट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सध्याची टीडीएस लिमिट ५० हजाराहून वाढवून ती आता एक लाख रुपये केली आहे.
Budget 2025: टीडीएस वजावटीचे दर आणि मर्यादा कमी करून स्रोतावर कर कपात (टीडीएस) तर्कसंगत करण्याचा प्रस्ताव आपण ठेवल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी म्हटले आहे.. तसेच, अधिक स्पष्टपणा आणि आणि एकरूपतेसाठी कर कपातीच्या मर्यादेत सुधारणा केली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजावरील कर कपातीची मर्यादा सध्याच्या ५०,००० रुपयांवरून दुप्पट करून १,००,००० रुपये करण्यात आली आहे असेही अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सांगितले.
* देशात २०० डे-केअर कर्करोग केंद्रे बांधली जाणार आहेत.
* वैद्यकीय उपकरणे आणि कर्करोगाची औषधे स्वस्त होतील.
* सहा जीवनरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी ५% ने कमी केली.
१३ रुग्ण सहाय्य कार्यक्रम मूलभूत कस्टम ड्युटीच्या बाहेर ठेवली आहेत