बीएसएफ जवानांनी भाजले वाळूवर पापड

0

बिकानेर सीमा परिसरातील जवानांचे फोटो झाले व्हायरल

 

बिकानेर(Bikaner), 22 मे (हिं.स.) : राजस्थानात गर्मीने हैदोस घातला असून अनेक ठिकाणी पारा 45 अंशाच्या पुढे गेलाय. अशा भयानक गर्मीत सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान सीमेवर सज्ज असून रणरणत्याउन्हात वाळूवर पापड भाजत असल्याचा फोटो व्हायरल झालाय.

भारत-पाकिस्तान सीमेवर जवानांनी उष्णतेची तीव्रता दाखवण्याचा अनोखा प्रयोग केला. येथे बीएसएफ जवानांनी वाळूवर पापड भाजले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये आपले सैनिक प्रतिकूल परिस्थितीत आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात कसे गुंतलेले आहेत हे दिसून येते. सध्या देशात प्रचंड उकाडा आहे. अनेक ठिकाणी तापमान 44 अंशांच्या पुढे गेले आहे. उष्णतेमुळे नागरिकांची अवस्था दयनीय झाली आहे. अशात राजस्थानमधून बीएसएफ जवानांचा फोटो व्हायरल झालाय. जवानांनी वाळूवर पापड भाजल्याने बिकानेरमध्ये कसली उष्णता जाणवत आहे, याचा अंदाज येतो. प्रतिकूल परिस्थितीत आपले सैनिक आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात कसे गुंतलेले आहेत, हे फोटोमध्ये दिसून येते. व्हायरल झालेला फोटो बिकानेरमधील खाजुवालाजवळील पाक सीमेचा आहे. राज्यातील सर्वात उष्ण शहर बिकानेर असल्याचे सांगण्यात येत आहे. कडाक्याच्या उन्हातही सैनिक देशाच्या रक्षणासाठी वालुकामय वाळवंटात उभे आहेत. दरम्यान, सैनिकांनी वाळूवर पापड भाजले. एकीकडे उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी लोक एसी आणि कुलरची मदत घेत आहेत, तर दुसरीकडे देशाच्या सीमेवर तैनात असलेले आपले जवान भीषण उन्हात रात्रंदिवस सतर्क आहेत.