भाऊ काणे यांचे निधन,मान्यवरांची शोकसंवेदना
नागपूर (Nagpur )-दादोजी कोंडदेव पुरस्काराने सन्मानित शहरातील ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक संजय उपाख्य भाऊ काणे यांचे ह्रदयविकाराने निधन झाले.आज सायंकाळी गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. भाऊ काणे यांच्या निधनाची वार्ता दुःखद असल्याची शोकसंवेदना केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या माध्यमातून भाऊंनी नागपूर शहरात अनेक खेळाडू घडवले. आज त्यांनी घडवलेले खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कर्तृत्व गाजवत आहेत. त्यांच्या निधनाने नागपूरच्या क्रीडा क्षेत्राची अपरिमित हानी झाली.
भाऊंसारख्या आधुनिक द्रोणाचार्यास भावपूर्ण श्रद्धांजली अशी शोकसंवेदना बावनकुळे यांनी व्यक्त केली.
Related posts:
भाजप महिला आघाडी मध्य नागपूर तर्फे महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर...
October 30, 2025LOCAL NEWS
सड़क सुरक्षा को बढ़ावा देने के लिए ‘जनआक्रोश’ की ‘गांधीगीरी’
October 30, 2025LOCAL NEWS
नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘शिववैभव किल्ले स्पर्धे’चा भव्य शुभारंभ
October 30, 2025LOCAL NEWS
















