निरक्षर सर्वेक्षण अभियानावर राज्य शिक्षक परिषदेचा बहिष्का

0

निरक्षर सर्वेक्षण अभियानावर राज्य शिक्षक परिषदेचा बहिष्कार नागपूर -राज्यातील शिक्षकांना नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत निरक्षर सर्वेक्षणाचे कामकाज करण्याचे निर्देशीत केले आहे. या कामावर राज्य शैक्षणिक परिषदेने बहिष्काराची भूमिका घेतली आहे. शैक्षणिक सर्वेक्षणाच्या नावाखाली अशैक्षणिक कामे शिक्षकांकडून करुन घेण्याची शासनाची भूमिका यातुन स्पष्ट दिसते. आर.टी.ई.अक्ट 2009 मधील प्रकरण 4 मध्ये कलम 27 नुसार शिक्षकाना जनगणना तसेच निवडणूक कामे वगळता इतर कुठलेही काम देऊ नये असे स्पष्ट नमुद केलेले आहे.
शिक्षकाना अशैक्षणिक कामे करण्यास भाग पाडणे संयुक्तिक नाही. हे काम करुन घेण्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा विरोध असून या कामावर बहिष्कार आहे. यासंबंधीचे निवेदन 24 आॕगस्ट रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री ,शिक्षणमंत्री ,प्रधान सचिव ,विभागीय आयुक्त आणि शिक्षण संचालक यांना देण्यात आले आहे. आम्हाला मुलांना शिकवू द्या, चंद्रपुर जिल्हात सर्व मतदार संघाकरिता शिक्षकांची केद्रस्तरीय अधिकारी BLO म्हणुन नेमणूक करण्यात आली आहे.सदर कार्यक्रमानुसार BLO यांचे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन मतदारांची तपासणी करण्याची कार्यवाही संपुर्ण जिल्हात सुरु आहे. सदर कामाच्या अनुषंगाने 71-चंद्रपुर – बल्लारशा विधानसभा मतदार संघातील शिक्षकांना दिनांक 22 ते 27 ऑगस्ट पर्यत पुर्ण वेळ सवलत देण्यात आली. ही सवलत संपुर्ण चंद्रपुर जिल्हात लागू करावी .यासंबधीचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना देण्यात आले आहे. म.रा.शि.प.चे.जिल्हाध्यक्ष विलास खोंड ,जिल्हा कार्यवाह दिलीप मॕकलवार , शहर कार्यवाह वसंत वडस्कर ,जिल्हा काॕन्व्हेंट प्रमुख विवेक आंबेकर निवेदन देतांना उपस्थित होते.