

श्री सिद्धिविनायक पब्लिसिटी प्रस्तुत ‘बॉलिवूड क्लासिक्स’ हा संगीतमय कार्यक्रम गुरुवार, 14 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे. 1970 ते 2000 या तीन दशकातील गाजलेली गाणी यावेळी गायक कलाकार सादर करणार आहेत.
लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात गुरुवारी सायंकाळी 6 वाजता होणार्या या कार्यक्रमात स्वाती खडसे आणि निकेता जोशी या अतिथी गायिका उपस्थित राहतील. निवेदन आरजे तेजल करणार आहेत. दत्तात्रय वझरकर, निरजा धांडे, मोहिनी देशपांडे, वर्षा लाखे, श्रीकांत लाखे, हर्षवर्धन वैरागरे, समीक्षा, आशिष, शशिकांत वाघमारे, शैलजा बडे आणि स्वप्ना पांडे हे गायक विविध गीते सादर करतील. परिमल जोशी, नितीन अहिरे, अशोक टोकलवार, महिंद्र वातुलकर यांची गायकांना वाद्यसंगत लाभणार आहे.
या निःशुल्क कार्यक्रमाचा आनंद रसिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री सिदृधीविनायक पब्लिसिटीचे संचालक समीर पंडीत यांनी केले आहे.