नाव बुडाल्याने ६ महिला मृत्यूमुखी

0

 

(Gadchiroli)गडचिरोली : नाव नदीत उलटल्याने सहा महिला बुडून मृत्यूमुखी पडल्याची दुदैवी घटना विदर्भात घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगेत ही घटना घडली असून एका महिलेस वाचविण्यात यश आले असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिला मजुरीसाठी निघालेल्या होत्या.

मंगळारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शेतांमध्ये मिरची तोडण्यासाठी मजुरीवर जाण्यासाठी या महिला छोट्या नावेने वैनगंगा पार करण्यासाठी निघालेल्या होत्या. गणपूर गावाजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत ही दुर्घटना घडली. एकूण सहा ते सात जणी या नदीतून पलिकडे निघाल्या होत्या त्यांच्यासोबत नावाडी सुद्धा होता. खराब हवामान आणि चिचडोह प्रकल्पाचे पाणी सोडल्याने पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे नाव हेलकावे खात होती. नाव उलटल्यानंतर नावाडी पोहून नदीबाहेर आला. एका महिलेस वाचविण्यात यश आले. मात्र. सहा महिला पाण्यात बुडून मरण पावल्या. जिजाबाई दादाजी राऊत, पुष्पा झाडे, रेवंता झाडे, मायाबाई राऊत, सुषमा राऊत, बुधाबाई देवाजी राऊत अशी मृत्यामुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. तर बचावलेल्य महिलेचे नाव सारुबाई सुरेश कस्तुरे असल्याचे सांगण्यात आले.

गणपूरवरुन चंद्रपूरला जाण्यासाठी रस्ते आणि वाहनांची व्यवस्थीत सोय नसल्याने ग्रामस्थांना नदीतून नावेच्या माध्यमातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. अनेक वर्षांपासून नदीवर पुलाची मागणी होत आहे.