
नागपूर (Nagpur) – बिझनेस नेटवर्किंग इंटरनॅशनल (BNI) नागपूरने जागतिक पातळीवर १४१९ प्रदेशांमध्ये अव्वल क्रमांक पटकावून भारताच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूर शहराला अभिमानास्पद ओळख मिळवून दिली आहे.
कार्यकारी संचालक भावेश तहलरामानी आणि ऋद्धी तहलरामानी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे बीएनआय नागपूरने हे ऐतिहासिक यश मिळवले. स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणे, त्यांची वाढ सुनिश्चित करणे आणि परस्पर सहकार्याने व्यवसाय वाढवणे हे त्यांच्या कार्याचे मूळ उद्दिष्ट राहिले आहे.
गेल्या दहा महिन्यांपासून जागतिक पातळीवर पहिल्या तीन स्थानांमध्ये असलेल्या बीएनआय नागपूरने आता अधिकृतपणे अव्वल क्रमांक पटकावला आहे. अत्याधुनिक मार्केटिंग टीम्स तयार करणे, सदस्यांना शिक्षण व प्रशिक्षण देणे आणि विश्वासाच्या आधारे व्यवसाय जाळे मजबूत करणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य ठरले आहे.
या यशामुळे नागपूरमधील व्यवसाय क्षेत्राला नवी दिशा मिळाली असून, उद्योजकतेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. बीएनआय नागपूरचे ब्रीदवाक्य – “नागपूर व्यवसाय करतोय ते पद्धत बदलतोय” – याचा प्रत्यय या घडामोडीतून स्पष्टपणे दिसतो.