श्रीवेद फाऊंडेशन आणि वेद व्हिजन फोर्च्युन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

0

नागपुर (Nagpur) : श्रीवेद फाऊंडेशन च्या आणि वेद व्हिजन फोर्च्युन प्रा.लि च्या यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षाचा शुभारंभ सामाजिक दायित्वाने करावा या हेतूने गुरुवार, दि. २ जानेवारी २०२५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदा या उपक्रमाचे ८ वे वर्ष आहे. मागीलवर्षी प्रमाणे या शिबिरातही लोककल्याण समितीच्या वतीने निःशुल्क हिमोग्लोबिन टेस्ट सह CBC टेस्ट करून मिळणार आहेत.

यासाठी आपण श्रीवेद फाऊंडेशन, C/O SIP हाऊस, राजीवनगर येथे सकाळी ९ ते ३ वेळात अवश्य यावे. निःशुल्क टेस्ट ११ ते २ यावेळात होईल.

अधिक माहिती करिता – 8087866817 या क्रमांकावर संपर्क करावा.
अवश्य यावे.

– प्रसाद हेरंब फडणवीस
– गौरी शास्त्री-देशपांडे
– निरंजन अरुण कायंदे