पंडित नेहरूंच्‍या जयंती निमित्त रक्तदान शिबिर

0

 

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वच्छता निरीक्षक पदविका, फायरमन अभ्यासक्रम आणि स्थानिक स्वराज्य संस्था पदविकेच्या विद्यार्थ्यानी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

जिल्हा आपत्ति व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे व डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ हर्षिता सोनी यांची प्रमुख उपस्थिती होती. अंकुश गावंडे यांनी रक्तदान करणाऱ्या सर्व विद्यार्थ्याचा ‘आपदा मित्र’ असा उल्‍लेख केला व रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असल्याचे सांगितले. डॉ सोनी यांनी रक्तदानांचे महत्व सांगून, हेडगेवार रक्तपेढी च्या अत्याधुनिक व्यवस्थाची माहिती दिली.

यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था सेवा पदविका (LGS) अभ्यासक्रमातील विद्यार्थी व महानगरपालिका नागपूरचे कर्मचारी श्री कल्याण खोब्रागडे यांना केंद्रीय गुणवत्ता सूची मध्ये तृतीय आल्याबद्दल धनादेश व प्रमाणपत्र देण्यात आले. संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक यांनी प्रास्ताविक केले तर अग्निशमन अभ्यासक्रमातील अध्यापक सुधाकर काळे व अप्रूप अडावडकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. अभ्यासक्रम समन्वयक सुशील यादव यांनी संचालन केले.