

(National Cancer Institute)नॅशनल कॅन्सर इन्स्टिटूट ने डॉ हेडगेवार रक्तकेंद्र आणि लोककल्याण डायग्नोस्टिक्स यांचे सहाय्याने बुधवार रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले. एनसीआय चे डॉक्टर्स, अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्गाने शिबिरात भाग घेतला.
वर्ष २०१७ पासून एनसीआय वर्षाला दोन रक्तदान शिबिर आयोजित करते, त्यातले हे पहिले. दुसरे शिबीर गणेश उत्सव दरमान्य आयोजित केले जाते. बुधवारी १०८ बाटल्या रक्त जमा झाले आणि २३२ व्यक्ती कडून सी बी सी, सिकल सेल आणि थेलिस्मिया चाचणी साठी रक्त नमुने घेण्यात आले.
कर्मचारी हिताच्या दृष्टीने एनसीआई आणि लोककल्याण डायग्नोस्टिक्स यांनी मिळून सर्व कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या विविध चाचण्या करण्याचे ठरविले आहे. हा उपक्रम गुरूवार पासून सुरू झाला.