भाजपचे विजयराज शिंदे यांचा अर्ज दाखल

0

 

बुलढाण्यात रंगत वाढली,भाजपचे विजयराज शिंदे यांचा अर्ज दाखल

बुलढाणा (Buldhana)– बुलढाणा लोकसभा निवडणुकीत मोठी रंगत वाढली आहे. बुलढाणा जिल्ह्यात लोकसभेला महायुतीत शिवसेनेला जागा सुटलेली असताना भाजपचे नेते माजी आमदार विजयराव शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरून एकच खळबळ माजवून दिली आहे. विजयराज शिंदे यांनी एक अपक्ष आणि एक पक्षाकडून असे दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या बॅनर्सवर विजयराज शिंदेंना जागा दिली जात नसल्याने विजयराज शिंदे नाराज होते, त्यातूनच त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भाजपच्या वरिष्ठांना आणि स्थानिक नेत्यांना आपण उमेदवारी अर्ज भरत असल्याच विजयराज शिंदे यांनी सांगितले असल्याचे त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभेत मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचे कट्टर विरोधक म्हणून विजयराज शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. यामुळे एकीकडे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत खासदार जाधव यांना दिलासा दिला असताना आता भाजपनेते विजयराज शिंदे यांच्या उमेदवारीने त्यांचा ताण वाढण्याची चिन्हे आहे.