चव्हाण यांच्या प्रवेशानंतर भाजपाची ताकद वाढली

0

 

 डॉ.भागवत कराड (Dr. Bhagwat Karad)

(Sambhajinagar)संभाजीनगर- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Former Chief Minister Ashok Chavan) यांनी काल भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण यांचे काम मराठवाड्यात व महाराष्ट्रामध्ये खूप चांगले आहे. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशानंतर भाजपाची ताकद वाढली आहे असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी व्यक्त केले आहे.(Union Minister of State for Finance Dr. Bhagwat Karad)

एनडीएच्या माध्यमातून 45 जागा जिंकायचे ध्येय समोर आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नक्कीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. भाजपची तत्त्वे मान्य आहेत ते भाजपामध्ये येतात. उद्धव ठाकरे संभाजीनगर दौरा टोटली फेल गेला आहे. जनता त्यांनी ऐकायला गेली नाही.उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्व सोडले आहे त्यामुळे हिंदू जनता त्या मतदान करणार नाही.आता उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या समाजाकडे जाऊन मते मागावीत असा टोला डॉ.भागवत कराड यांनी लगावला.