राज्यसभेसाठी भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर

0

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी भारतीय जनता पक्षाने आज, बुधवारी राज्यसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात 5 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. भाजपने ओडिशातून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना उमेदवारी दिली आहे, तर माया नरोलिया आणि एल मुरुगन यांना मध्य प्रदेशातून तिकीट देण्यात आले आहे. यासोबतच मध्य प्रदेशातून बन्सीलाल गुर्जर आणि उमेशनाथ महाराज या दोघांना देखील तिकीट देण्यात आले आहे.भाजपने यापूर्वी 11 फेब्रुवारी रोजी राज्यसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली होती. या यादीत बिहार, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. सुधांशू त्रिवेदी आणि आरपीएन सिंग यांना उत्तर प्रदेशातून तिकीट देण्यात आलेय. भाजपच्या दोन्ही याद्या मिळून आतापर्यंत 19 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

पहिल्या यादीत भाजपने बिहारमधून 2 उमेदवारांना तिकीट दिले असून त्यात धरमशीला गुप्ता आणि डॉ भीम सिंह यांच्या नावाचा समावेश आहे. छत्तीसगडमधून राजा देवेंद्र प्रताप सिंह, हरियाणातून सुभाष बराला, कर्नाटकातून नारायण कृष्णसा भंडगे, उत्तराखंडमधून महेंद्र भट्ट आणि पश्चिम बंगालमधून समिक भट्टाचार्य यांना तिकीट देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधून आरपीएन सिंग, सुधांशू त्रिवेदी, चौधरी तेजवीर सिंग, साधना सिंग, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत आणि नवीन जैन यांना तिकीट देण्यात आले आहे.निवडणूक आयोगाने 31 जानेवारी रोजी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यसभेचे 50 सदस्य 2 एप्रिलला तर 6 सदस्य 3 एप्रिलला निवृत्त होत आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी असून, 16 फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होणार आहे. यंदा राज्यसभेच्या एकूण 69 जागांवर निवडणूक होणार असून, त्यापैकी 56 जागांवर आधी निवडणूक होत आहे.

क्रिस्पी थ्रेडेड पनीर टिक्का | Shankhnaad News #shankhnaadnews #live