
नागपूर NAGPUR – देशात आज चार राज्यातील विधानसभा Assembly निकालाचा, भाजपने मिळविलेल्या महाविजयाचा उपराजधानी नागपुरात जल्लोष साजरा होत आहे.
नागपूरच्या धंतोलीस्थित भाजा विभागीय कार्यालयासमोर आनंदोत्सवात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे स्वतः ढोल वाजवित, कार्यकर्त्यांना पेढे भरवत सहभागी झाले.भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी नाचत केला जल्लोष साजरा. महिलांचा फुगडी खेळत जल्लोष यावेळी पहायला मिळाला. जसजसे निकाल येत होते तसा नागपूरच्या विभागीय कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष ढोलताशाच्या गजरात यात अधिकच वाढताना दिसला. यावेळी शहर अध्यक्ष बंटी कुकडे, आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे Bunty Kukde, MLA Praveen Datke, Krishna Khopde, Vikas Kumbhare आदींसह मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मोदीजींची गॅरंटी सर्वांवर भारी पडली!
दरम्यान, यावेळी बावनकुळे म्हणाले, मतदारांनी विश्वास टाकला आणि भाजपाला महाविजय मिळवून दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या लोकप्रियतेमुळे भाजपाच्या या ऐतिहासिक व अभूतपूर्व विजयाची पताका डौलाने फडकू लागली. पंतप्रधानांच्या नेतृत्वावर जनतेचा अढळ विश्वासासह स्त्री शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंबे या चार अमृत स्तंभाचा होत असलेला शाश्वत विकास म्हणजे आजचा विजय आहे.गृहमंत्री अमित शहा यांच्या कुशल रणनीतीचा, भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या संघटन कौशल्याचा तसेच त्या त्या राज्यातील नेतृत्वाचा हा विजय आहे. ‘इंडि’ला मात देत ‘भारत’ जिंकला..!! असेही बावनकुळे म्हणाले.