भाजपाचा डीएनए ओबीसी आहे..! – डॉ. आशिष देशमुख

0

 

– यवतमाळ, पांढरकवडा, वणी, वरोरा येथे जनसंपर्क करीत ओबीसी जागर यात्रा पोहोचली गडचिरोलीला.
– डॉ. आशिष देशमुख आणि संजय गाते यांचे नेतृत्वाखाली जनजागृती

नागपूर -ओबीसी  OBC हिताच्या योजनांची जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र भ्रमण करण्यास निघालेली भाजपाची ओबीसी जागर यात्रा आज दुसऱ्या दिवशी यवतमाळ, पांढरकवडा, वणी, वरोरा येथे जनसंपर्क करीत ठिकठिकाणी मेळावे घेत गडचिरोलीला पोहोचली. भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिष र. देशमुख आणि भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांच्या नेतृत्वात ओबीसी जागर यात्रा महाराष्ट्र पादाक्रांत करणार आहे. The OBC Jagar Yatra reached Gadchiroli after conducting public relations at Yavatmal, Pandharkawda, Vani, Varora. 

ओबीसी समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना पोहोचाव्यात, यासाठी ही ओबीसी जागर यात्रा निघाली आहे. यवतमाळ येथे मदन येरावार यांनी मार्गदर्शन केले. १९५४ पासून कॉंग्रेसची भूमिका ओबीसी समाजविरोधी राहिलेली आहे. नेहरू-गांधी परिवार आणि कॉंग्रेसने ओबीसींचा द्वेषच केला आहे. राहुल गांधी हे सातत्याने ओबीसींच्या नावाचा वापर करून कॉंग्रेसचे काहीच न उरलेले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहेत. १९८० मध्ये कॉंग्रेसने मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्या असत्या तर ओबीसींच्या दोन पिढ्या गारद झाल्या नसत्या यावर डॉ आशिष देशमुख यांनी भर दिला. एमपीएससी, युपीएससी, आयपीएस, आयएफएसमध्ये ओबीसींचा वाढलेला टक्का नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो. ओबीसींच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी पाठवून त्यांचे भविष्य उज्वल करण्याचे काम भाजपाचे राज्य सरकार मोठा खर्च करून करीत आहे.

फडणवीस सरकारने ओबीसी मंत्रालय स्थापन केले. २२ जीआर फडणवीस सरकारने काढले. खऱ्या अर्थाने भाजपाचा डीएनए हा ओबीसी आहे. ओबीसी भाजपाचा आणि भाजपा ओबीसींचा, हा मूलमंत्र प्रत्येक गावात जागर यात्रेच्या माध्यमातून पोहोचविण्याची गरज आहे. ओबीसींच्या माध्यमातून हंसराज अहीर राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष झाले. मोदीजींनी ओबीसी समाजाला सन्मान देण्याचे काम केले. ओबीसी समाजाच्या लहान घटकांपर्यंत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना पोहोचविण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांची आर्थिक उन्नती आणि समृद्धी होणार आहे. भाजपा राज्याच्या सत्तेत असून येणाऱ्या ३ वर्षात १० लाख घरं राज्य सरकारच्या निधीमधून, प्रधानमंत्री घरकुल योजनेतून, ओबीसी समाजाला मिळणार आहेत. शासनाच्या योजनांचा लाभ ओबीसी समाजाला मिळावा, यासाठी आपण प्रयत्नरत आहोत. कॉंग्रेसचे नेते भाजपाच्या या ओबीसी जागर यात्रेबद्दल उलट-सुलट बोलत आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनीसुद्धा ओबीसी मंत्रालय बघितले आहे.

कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार हे बोगस ओबीसी मंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात ओबीसी समाजासाठी एकही चांगला निर्णय घेतल्या गेला नाही. विजयभाऊंनी त्यांच्या कार्यकाळात ओबीसी समाजासाठी काय केले, हे त्यांनी सांगावे. ते स्वत: काही करू शकले नाहीत आणि आता उलट्या बोंबा मारत आहेत. कॉंग्रेसचे नेतेच त्यांना विचारत नाहीत, अशी त्यांची अवस्था आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ही आपल्या राज्य सरकारची भूमिका आहे. भाजपा ओबीसी समाजाच्या पाठीशी आहे”, असे प्रतिपादन भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.

सर्वश्री तारेंद्रजी बोर्डे, महादेवजी सुपारे, राजाभाऊ डांगे, सुनील समदुरकर, डॉ. शिरभाते, चिंतामण पायधन, राजू पडगीलवार, विजय कोटेजा, बाळूभाऊ शिंदे, अमोल ढोणे, सौ. रेखाताई कोठेकर, सौ. मायाताई शेरे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. हजारोंच्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती.

ही यात्रा पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील ११ही जिल्हे पादाक्रांत करेल. पहिल्या टप्प्याचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरादेवी, जि. वाशीम येथे होईल. २ ऑक्टोबरला सेवाग्राम, पार्डी, हिंगणघाट, देवळी, कळंब या ठिकाणी या यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मेळावे आणि जनसंपर्क कार्यक्रमात नागरिकांनी हजारोंच्या संख्येत उपस्थिती दर्शविली. नवरात्रानंतर उत्तर महाराष्ट्रात ही यात्रा भ्रमण करणार आहे