भाजप महिला आघाडी मध्य नागपूर तर्फे महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान

0

नागपूर : आमदार सांस्कृतिक महोत्सवा तर्फे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन आमदार सांस्कृतिक महोत्सव व भारतीय जनता पार्टी महिला आघाडी मध्य नागपूर यांच्यातर्फे मध्य नागपुरात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मध्य नागपुरचे आमदार प्रवीण दटके यांच्या संकल्पनेतून साकार आमदार सांस्कृतिक महोत्सवा तर्फे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन मध्य नागपुरात गांधीबाग मंडळ, इतवारी मंडळ, महाल मंडळ या तिन्ही मंडळात 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलेले आहे. ठिपक्यांची रांगोळी, फ्री हँन्ड, संस्कार भारती या तीन प्रकारांमधे रांगोळी काढायची आहे. रांगोळी स्पर्धेत आकर्षक पुरस्कार देण्यात येणार आहे, प्रत्येक वार्डात एक पुरस्कार तसेच प्रथम, द्वितीय, तृतीय असे तीन पुरस्कार असे एकूण 25 पुरस्काराचे आयोजन या स्पर्धेमध्ये करण्यात आलेले आहे . महिलांच्या कलागुणांना वाव मेळावा व या स्पर्धेतून अनेक महिला रांगोळी कलाकारांची ओळख व्हावी व रांगोळी कलाकारही समाजासमोर याव्यात तसेच महिलांना स्वतंत्र मंच या माध्यमातून मिळावा या दृष्टीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी महिला आघाडी मध्य नागपूरच्या माजी नगरसेविका श्रद्धा पाठक यांच्या अध्यक्षतेत आमदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या सदस्या श्रद्धा पाठक यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मध्य नागपुरातील प्रत्येक महिलेने आपल्या घरासमोर रांगोळी काढावी व या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घ्यावा असे पत्रकारांना सांगितले. त्यावेळी मंचावरील श्रद्धा पाठक, अनिता काशीकर, श्वेता भोसले, निकिता पराये, सरला नायक, कविता इंगळे, रेखा निमजे यांची उपस्थिती होती.