
इटानगर(Itanagar), 02 जून अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी झालेल्या मतदानानंतर आज, रविवारी मतमोजणी करण्यात आली. यात भाजपने आतापर्यंत 34 जागांवर विजय मिळवला आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत, त्यापैकी 50 जागांवर मतदान झाले असून 10 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने 34 जागा जिंकल्या असून 11 जागांवर आघाडीवर आहे. देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस अद्याप आपले खातेही उघडू शकलेला नाही आणि केवळ एका जागेवर आघाडीवर आहे. एनपीपीने दोन जागा जिंकल्या आहेत, पीपीएने दोन जागा जिंकल्या आहेत आणि एका अपक्ष उमेदवाराने एक जागा जिंकली आहे. दरम्यान अरुणाचल प्रदेशातील लोकसभेच्या दोन जागांसाठी 4 जून रोजीच मतमोजणी होणार आहे.
Related posts:
रेलवे पुलिस की तत्परता से महिला यात्री को मिला खोया हुआ बैग
October 25, 2025MAHARASHTRA
कळमेश्वर गोंडखैरी उड्डाणपूलास मंजुरी-डॉ. राजीव पोतदार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश
October 23, 2025MAHARASHTRA
मध्य भारत में दवा और रसायन उद्योगों को बढ़ावा देने के लिए नागपुर में सीडीएससीओ कार्यालय स्थापित करें
October 23, 2025Breaking news













