Birthday celebration : पारडसिंगा येथे अंबादास महाराज यांचा ८२ वा जन्मोत्सव व सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा

0

पारडसिंगा (Pardsinga) :- भव्य सोहळ्याला विदर्भातील संत महंत,मान्यवरांची उपस्थिती.
काटोल – श्री संत लहानुजी महाराजांचे कृपा प्रसादिक श्री संत अंबादासमहाराज(Shri Sant Ambadasmaharaj) (कन्होली) यांच्या ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त अनुसया मातेची पुण्यभूमी श्रीक्षेत्र पारडसिंगा येथे सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्या निमित्त 21 जून ला विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी श्री च्या चरण पादुकांचे आगमन, अभिषेक व पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येईल.

विदर्भातून येणार विविध दिंड्या..
कार्यक्रमात सहभाग करिता श्री समर्थ लहानुजी महाराज संस्थान टाकरखेडा, श्री समर्थ सद्गुरु सत्यदेव महाराज संस्थान भारवाडी, वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थान गुरुकुंज मोझरी, श्री संत आडकोजी महाराज संस्थान वरखेड,श्री संत अच्युत महाराज संस्थान वरुड आदी ठिकाणाहून विविध दिंड्या पालख्याचा सहभाग राहणार आहेत.

कार्यक्रमाची रुपरेषा… सकाळी ८:३० वाजता तीर्थस्थापना व होम हवन, अनुसया माता नाम जप होईल १०:३० वाजता दीपप्रज्वलन यावेळी सुश्री साध्वी अर्पिता दीदी, वनदेवी साधीका आश्रम (तीनखेडा) व सौ. नलिनीताई सितारामजी बोडे, सौ. भावनाताई रा. खरडे, (माजी सरपंच साहूर), शिवानी ताई नाथे, गुरुदेव सेवा मंडळाचे नागपूर जिल्हा सेवा अधिकारी बाबाराव पाटील, श्री मौनी महाराज, संस्कार चोरे, माणिक दास बेलूरकर, (वरखेड) , उल्हास नेमाडे (जळगाव खान्देश) विश्व वारकरी सेना जिल्हाध्यक्ष अमरावती ह भ प विठ्ठल महाराज चौधरी, ग्रामगीताचार्य राजेश गवळी, संत गाडगेबाबा मंडळ अमरावतीचे अध्यक्ष अभिजीत वानखडे, ह भ प ग्रामगीताचार्य गजानन महाराज भोरे (साहूर), यांची उपस्थिती राहणार आहे.

त्यानंतर मुख्य कार्यक्रम सकाळी १०:३० वाजता आळंदी येथील हभप पंकज महाराज पवार यांचे गोपाल काल्याचे किर्तन होईल. तदनंतर १२:३० वाजता उपस्थित संत श्री अंबादास महाराज, श्री संत सयाजी महाराज, श्री संत भानुदास महाराज, श्री रोहिदास बाबा, संत योगीराज महाराज, महंत सुरेशानंदजी गिरी, महंत अशोकदास बाबा, महंत माधव दास बाबा यांचे स्वागत पूजन त्यानंतर श्री संत अंबादास महाराज यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा संपन्न होईल.

गुणवंत विद्यार्थी व प्रगतीशीलशेतकऱ्यांचा सत्कार….
यावर्षी वर्ग १० व वर्ग १२ मध्ये काटोल, नरखेड तालुक्यातुन प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच काटोल, नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘प्रगतशील शेतकरी पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येईल. याच कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट खेळाडू व सेवेकऱ्यांचा देखील सन्मान सत्कार करण्यात येईल.

दहीहंडी,गोपालकाला,महाआरती व राष्ट्रवंदना महाप्रसादाने कार्यक्रमाने सांगता होईल. सूत्रसंचालन ह भ प श्री गजानन महाराज भोरे व स्नेहा ताई लोही करतील.

या नेत्र दीपक सोहळ्याला श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेड चे कार्यकारी संचालक बाळासाहेब पावडे, सती अनुसया माता संस्थान पारडसिंगाचे अध्यक्ष चरणसिंग ठाकूर, श्री संत अंबादास महाराज संस्थानचे सचिव प्रभाकरराव देशमुख, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, सरचिटणीस जनार्दन पंत बोथे, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे सल्लागार तथा श्री संत अच्युत महाराज जन्मशताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष सुधीरजी दिवे, श्री समर्थ अडकुजी महाराज संस्थानचे सचिव अभिजीत बोके, श्री संत मायबाई संस्थान आर्वीचे अध्यक्ष कृष्णाजी गिरधर, विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूरचे अध्यक्ष नामदेवराव अमाडकर, श्री संत मुंगसाजी महाराज संस्थान जोडमोह चे अध्यक्ष हरिभाऊ अंभोरे, श्री संत खटेश्वर महाराज संस्थान धामणगाव देव चे अध्यक्ष नंदकुमार कुकुलवार, श्री संत गाडगेबाबा समाधी ट्रस्ट चे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, हनुमान मंदिर कमिटी (जामसावळी मध्यप्रदेश)चे अध्यक्ष धिरज चौधरी ,प्राचार्य सुधीर बुटे कोंढाळी , संत अच्युत महाराज संस्थान शेंदुरजना बाजारचे अध्यक्ष अनिल सावरकर, सचिव मनोहर निमकर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान धापेवाडा चे अध्यक्ष आदित्य पवार, भिकाजी महाराज संस्थान आष्टाचे सचिव उमेश चरपे, यशवंत महाराज संस्थान मुसळखेडाचे विश्वस्त तसेच पारडसिंगा संस्थान विश्वस्थ महेंद्र खंडाईत, दिनेश ठाकरे, लहानोजी महाराज संस्थानचे सेवाधिकारी अशोकराव पावडे, पुरुषोत्तम भड गुरुजी, सुनील नाथे, चंद्रकांत पोतदार, वसंतराव महल्ले, गजानन बाग अध्यक्ष मधुकर भावसार नागपूर , ज्ञानेश्वर महाराज पाटसे, विजय महाराज खंडेलवाल, विजय राऊत, विजय उजाडे, सुशील पाटील गावंडे, गोपालराव गावंडे, राजेश खरडे, गिरीश इटकेलवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाला पंचक्रोशीतून विविध पालख्यांचे आगमन होणार असून कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री संत लहानुजी महाराज संस्थान रिधोरा, श्री संत लहानुजी महाराज उत्सव सेवा समिती नागपूर जिल्हा, श्री संत गजानन महाराज पारायण समिती काटोल नरखेड तालुका व श्री संत अंबादास महाराज अमृत महोत्सव समिती यांचे वतीने करण्यात आले असून समस्त सदभक नागरिकांनी संत दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांच्या वतीने केले आहे.

आयोजनासाठी श्री संत लहानुजी महाराज कन्स्ट्रक्शन चे संचालक अवि मनोहरराव राऊत परिश्रम घेत आहे .