

दरवर्षी नोव्हेंबरमध्ये थंडीत वाढ होताच जिल्ह्यातील तलाव जलायशांवर विदेशी पक्ष्यांचे आगमन होते. परंतु, यंदा वातावरणातील सततच्या बदलांने विदेशी पक्ष्यांचे आगमन काहीसे उशिराने झाले आहे. तीन दिवसांपासून जलाशयांवर स्थलांतरित विदेशी पक्ष्यांचे दर्शन होण्यास सुरवात झाली. त्यामुळे पक्षी प्रेमी, पक्षी निरीक्षकांत उत्साह संचारला.
जलाशयांवर मोरकंठी लिटकुरी (व्हेर्डीटर फ्लायकॅचर), स्वर्गीय नर्तक (एशियन पॅराडाइज फ्लायकॅचर), मुनिया (ट्राय कलर मुनिया), पेन्टेड स्टॉर्क (रंगीत करकोचे), उघड्या चोचेचा करकोचा (ओपनबिल स्टॉर्क), शेकाट्या (ब्लॅक विंग्ड् स्टिल्ट), हळदी कुंकु बदक (स्पॉटबिल डक), चक्रवाक (रुडी शेलडक किंवा ब्राम्हणी डक), चतुरंग बदक (मलार्ड), नीळ्या गालाचा वेडा राघू (ब्लू-चीक स्वर्गीय नर्तक बी-इटर) आदीचे तीन दिवसांपासून आगमनास सुरवात झाली.
जिल्ह्यातील नल दमयंती जलाशय, भिवापूर तलाव, छत्री तलाव, वडाळी, वरूड बगाजी सागर, वर्धा नदी पात्र, कृष्णा सागर आदी जलाशयांवर हिवाळ्याच्या सुरवातीस विदेशी पक्ष्यांचे आगमन होण्यास सुरवात होते यंदा थंडी उशिरा पडल्याने त्यांचे आगमनही उशिरानेच झाले . निसर्गचक्रात बदलाने पक्ष्यांचे आगमन लांबले पाच महिने परदेशी पाहुणे पक्षी जिल्ह्यात राहतात. त्यानंतर मार्चमध्ये हे पक्षी परतीचा प्रवास करतात यंदा परतीचा पाऊस लांबला. त्यामुळे निसर्गचक्रात बदल झाल्याने यंदा पक्ष्यांचे आगमन लांबले, असे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे.
हवामानातील बदलांवर अवलंबून असते आगमन जिल्ह्यात हिवाळ्यात पाहुणे पक्षी विविध जलाशयांवर हजेरी लावतात. त्यांच्या हजेरीची वेळ हवामानातील बदलांवर अवलंबून असते. त्यांच्या भागात थंडीचे प्रमाण वाढून त्यांना अन्न, निवारा मिळेनासा झाला की, ते देशातील जलाशयांकडे घाव घेतात. जिल्ह्यातील तलावांवर स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन घडत आहे, असे पक्षीमित्र नीलेश कंचनपुरे यांनी सांगितले.