भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू

0

 

Bhandara accident crime 

भंडारा (bhandara ), ३ एप्रिल,  :- भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना तुमसर सिहोरा राज्य मार्गावरील डोंगरला येथे घडली. अतुल मीताराम घुर्वे वय (४०)वर्ष, रा. तीलक नगर तुमसर ता.तुमसर जि.भंडारा असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अतुल व त्याचा मित्र राम हे त्याच्या दुचाकी ने सकाळी तुमसर वरुन डोंगरला जात होते.

दरम्यान डोंगरला गावाजवळ ट्रक चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवुन मृतक व त्याच्या मित्राला मागेहुन ट्रक ने कट मारुन गंभीर जखमी केले. मृतक अतुल व त्याच्या मित्राला उपचारा करीता उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी केली. अतुल ला मृत घोषित केले.तर मृतकाचा मित्र राम धुर्वे जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.