वनराज आंदेकर हत्या प्रकरणी मोठी अपडेट; गोळीबाराचा VIDEO आला समोर

0
वनराज आंदेकर हत्या प्रकरणी मोठी अपडेट; गोळीबाराचा VIDEO आला समोर
Big update on Vanraj Andekar murder case; The video of the shooting came out

पुणे:-पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर काल (1 सप्टेंबर) रोजी भर चौकात गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे. आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वनराज आंदेकर यांना पाच राऊंडपैकी एक देखील गोळी लागली नाही.मात्र, गोळीबार केल्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आला, त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. (Vanraj Andekar Murder )

या प्रकरणी आता पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतल्या डोके तालीम परिसरात वनराज आंदेकर थांबले होते, तेव्हा त्यांच्यावर हल्लेखोराने गोळीबार केला.

वनराज आंदेकर हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर

गोळीबाराच्या आधी डोके तालीम भागामध्ये वीज पुरवठाही खंडीत झाल्याची माहिती मिळत आहे. म्हणजेच हा सगळा प्लॅन करून केलेला कट असल्याचं म्हटलं जातंय. या घटनेमुळे पुण्यात दहशतीचं वातावरण आहे. यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

हल्ल्यानंतर वनराज आंदेकर यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पण, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. यापूर्वी पुण्यात शरद मोहोळ यांची देखील हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा असा प्रकार घडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे गोळीबाराच्या घटनेनं हादरलं आहे.(Vanraj Andekar Murder )

वनराज आंदेकर यांची पार्श्वभूमी काय?

वनराज आंदेकर हे 2017 च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नगसेवक म्हणून निवडून आले होते. 2017 ते 2022 या कालावधीत वनराज आंदेकर नगरसेवक होते. त्यांच्या आई राजश्री आंदेकर या देखील नगरसेवक होत्या. तर, वनराज यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेसुद्धा नगरसेवक होते. वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौर होत्या.(Vanraj Andekar Murder )

गेल्या 25 वर्षांपासून आंदेकर टोळीचा पुण्यातील अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये हात असल्याची माहिती समोर आली आहे. प्रमोद माळवदकर या गुंडाच्या खून प्रकरणी वनराज आंदेकरचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी यांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.