
मागील 15 दिवसांपासून महाराष्ट्राला चांगलेच झोडपून काढले आहे. अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट देखील देण्यात आला होता. पावसासंदर्भात महत्त्वाची मात्र जरा वेगळी अपडेट समोर आली आहे. राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. पाऊस थोडी विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुढचे 3-४ दिवस राज्यात पावसात घट होणार आहे. हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे. गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात कोसळणारा पाऊस जरा विश्रांती घेणार आहे. मात्र, 2 ऑगस्टच्या आसपास राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. अनेकजण पावसाळी पिकनिकचा बेत आखत आहेत. सध्या मात्र, पाऊस विश्रांती घेणार असल्यामुळे धबधबे तसेच पर्यटनस्थळांवरील गर्दी कमी होवू शकते.