

सोनं गाठणार 80000 चा टप्पा, तर चांदीही 94000 जवळ
मुंबईत सोन्याचा भाव हा 78 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडला आहे. एकाच दिवसात सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Gold Silver Rate News : पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावाचा सोन्या चांदीच्या भावावर (Gold Silver Rate) देखील परिणाम पाहायला मिळत आहे. मुंबईत सोन्याचा भाव हा 78 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडला आहे. एकाच दिवसात सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल सोन्याचा भाव हा 77 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. दरम्यान, दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 80 हजारापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
चांदीचा भाव 93 हजार 800 रुपये प्रति एक किलोवर
मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याबरोबरच चांदीच्या दराला देखील चांगलीच झळाळी येत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज चांदीचा भाव 93 हजार 800 रुपये प्रति एक किलोवर पोहोचला आहे. वाढत जाणाऱ्या दरामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सोन्याचे भाव वाढण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. मध्यपूर्वेतील तणाव संपत नाही. त्यामुळं सोन्याच्या भावाला आधार मिळत असल्याचे दिसत आहे. भारतीय बाजारपेठेपासून ते परदेशी बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.