जुने वाहन मोडीत काढा आणि नव्या वाहनासाठी मिळवा ‘इतकी’ टक्के कर सवलत, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

0

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता स्वतः च्या इच्छेने वाहन मोडीत काढले तर पुढच्या नवीन वाहन खरेदीसाठी 15 टक्के कर सवलत मिळणार आहे. स्वेच्छेने वाहन मोडीत काढणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा त्याचप्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना 15 टक्के कर सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रावर परिवहन प्रकारातील वाहनांना नोंदणीपासून 8 वर्षांच्या आत वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास तसेच परिवहनेतर प्रकारातील वाहनांना नोंदणी पासून 15 वर्षांच्या आत स्वेच्छेने वाहन मोडीत काढल्यास 10 टक्क्यांची कर सवलत दिली जात होत होती. दुचाकी, तीन चाकी किंवा हलके मोटार वाहन मोडीत काढलेले असेल, त्याच प्रकारचे वाहन खरेदीनंतर नोंदणी करताना ही कर सवलत लागू होणार आहे.

याचाच अर्थ असा की तुम्ही दुचाकी मोडीत काढली असेल तर पुढे भविष्यात तुम्ही दुचाकी विकत घेणार असाल तर तुम्हाला त्यावर 15 टक्के कर सवलत मिळते. याबाबतची अधिसूचना जाहीर झाल्यापासून तीन वर्षांच्या आत असे वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास ही कर सवलत मिळणार आहे.