“मै मेरी झांसी नही दुंगी..”

0

भावना गवळींचा इशारा

यवतमाळ YAWATMAL  : यवतमाळ-वाशिमच्या खासदार BHAWANA GAWALI भावना गवळी यांच्या जागी संजय राठोड यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरु असतानाच आता भावना गवळी यांनी महायुतीच्या मेळाव्यातच नेत्यांना आव्हान दिले आहे. “मै मेरी झांसी नही दुंगी..” अशी घोषणा करताना त्यांनी मतदारसंघावरील दावा कायम ठेवला आहे. खासदार भावना गवळी या पाचवेळा निवडून आल्या आहेत.

महायुतीच्या मेळाव्यात घटक पक्षांनी आपआपल्या पक्षाची भक्कम दावेदारी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघावर केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या खा. गवळी यांनी ‘फिर जो भी होंगा देखा जायेगा’, असे म्हणत घटक पक्षांच्या नेत्यांना एकप्रकारे थेट इशाराच दिल्याचे बोलले जात आहे. इतकेच नाही तर संजय राठोड लोकसभा लढण्यास आपली दारव्हा-दिग्रस विधानसभा मतदारसंघावर दावेदारी राहील, असेही त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखविले. भावना गवळींच्या दाव्यावर पालकमंत्री राठोडांनी कोणतेही भाष्य करण्याचे टाळले.

भ्रष्टाचार व आर्थिक अनियमिततांच्या आरोपांवरुन खासदार गवळी अडचणीत आहेत. अलिकडेच त्यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती आयकर विभागाकडून गोठवण्यात आली आहेत. आयकर विभागाच्या नोटिसीला समाधानकारक उत्तर न दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. त्यांनी ८.२६ कोटी रुपये आयकर न भरल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे त्यांना नोटीस पाठवून ते भरण्यास सांगण्यात आले होते.