भावना गवळी पक्षादेशाने कामाला लागल्या

0

 

 

यवतमाळ(Yavatmal)– भावना गवळी ऍक्टिव्ह आहेत.पक्षाने दिलेली जबाबदारी त्या पार पाडत आहेत. भावना गवळी ह्या नॉटरीचेबल नाहीत, त्या सात्यत्याने आमच्या संपर्कात आहेत. योग्य वेळी त्या प्रचारात उतरतील असा विश्वास
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर आज गुढीपाडवानिमित्त संजय राठोड तथा भाजप आमदार निलय नाईक हे पोहरादेवी येथे आज आले असता त्यांनी बंद दाराआड एक तासभर चर्चा केली. यावेळेस त्यांच्यासह बंजारा महंत कबिरदास महाराज हे उपस्थित होते. यावेळी संजय राठोड यांना विचारले असता सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात असे मंत्री संजय राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.