

प्रो. राजेंद्र सिंग यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष आयोजन
प्रो. राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरीतर्फे प्रो. राजेंद्र सिंग उपाख्य रज्जू भय्या यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, 29 जानेवारी 2025 रोजी भटनागर पुरस्कारप्राप्त आणि जे. सी. बोस फेलो शास्त्रज्ञ प्रो. अमित अग्रवाल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईच्या मेकॅनिकल इंजिनीयरींग विभागाचे प्राध्यापक असलेले अमित अग्रवाल ‘दि फॅसिनेटिंग वर्ल्ड ऑफ फ्लूईड फ्लो’ या विषयावर विचार व्यक्त करतील.
प्रो. राजेंद्र सिंह सायन्स एक्सप्लोरेटरी, दुसरा मजला, तारकुंडे धरमपेठ बॉईज हायस्कूल, उत्तर अंबाझरी रोड येथे सायंकाळी 5.45 वाजता हे व्याख्यान होणार आहे, असे संचालक डॉ. सीमा उबाळे यांनी कळवले आहे.