
मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
मंगरूळपीर :- मंगरूळपीर येथील कविवर्य भास्कर जीवने यांच्या ‘सूर्याचं वाघरू’ या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा मंगरूळपीर येथे दि.२० रोजी शहरालगत असलेल्या खाडे सभागृहात दुपारी १२ वाजता ज्येष्ठ साहित्यिक प्रा.अशोक पळवेकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी व्ही.पी.पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम चित्रकार, यवतमाळ बळी खैरे, सचिव अशोक कांबळे, मुख्याध्यापिका कु.किरण कांबळे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कवी भास्कर जीवने यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. डॉ.अशोक पळवेकर यांच्या हस्ते ‘सूर्याचं वाघरू’ या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात व्ही.पी.पाटील म्हणाले की, कवी महासूर्याचे वाघरू बनतो आणि विद्रोहाच्या शब्दांतून आपली अस्मिता मांडतो. ‘सूर्याचं वाघरू’ या कविता संग्रहाचे कवी भास्कर जीवने हे माझे भाचे असून त्यांना पहिल्यांदाच आंबेडकरवादी साहित्य क्षेत्रात प्रवेश करतांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. म्हणून त्यांची अडचण दूर करण्याचा मी थोडाफार प्रयत्न केला आहे. कारण या कवीच्या कविता संग्रहाला मीच प्रस्तावना लिहून नवोदित कवी माझ्या ऊर्जेची शाई पुरविली आहे, असे मत त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.यावेळी किरण कांबळे म्हणाल्या, ‘सूर्याचे वाघरू’ हा कविता संग्रहामध्ये समाज जीवनाचे वास्तव असून हे साहित्य क्षितीजावरील उगवता तारा लेखणीतून झिरपती सहज काव्यधारा काव्य जयाची जिवन संजिवनी उदड आशिष त्याला या विशेषदिनी.
या कार्यक्रमाचे संचलन प्रा.डॉ.रंजना मेंढे यांनी केले तर आभार संजय भगत यांनी मानले.या कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
साहित्य क्षितीजावरील उगवता तारा लेखणीतून झिरपती सहज काव्यधारा काव्य जयाची जिवन संजिवनी उदड आशिष त्याला या विशेषदिनी.