पाईप लाईन फुटली, जे व्हायचं नव्हतं नेमकं तेच घडलं

0

 

भंडारा (Bhandara), 18 जुलै भंडारा शहरासाठी नव्याने सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. मात्र काही भागांमध्ये नळ योजना सुरू करण्यात आली. मात्र काहीच दिवसांमध्ये हे काम किती निकृष्ट आहे हे समोर आले आहे.

भंडारा शहरातील खात रोडवर यशोदा नगर येथे पाण्याच्या टाकी जवळ असलेल्या मोठ्या पाईपलाईन मध्ये अचानक जॉईन्ट सुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. पाण्याचा प्रवाह एवढा जास्त होता ज्यामुळे संपूर्ण रस्ताच वाहून गेलेला आहे. त्याची माहिती पाणीपुरवठा विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी ती पाईप लाईन बंद केली. मात्र तोपर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले. आता कंत्राटदारा तर्फे पुन्हा पाईपलाईन जोडण्याचं काम सुरू केलेलं आहे. तसेच फुटलेला रस्ता पुन्हा केला जाईल असे उपस्थित कंत्राटदाराच्या लोकांमार्फत सांगण्यात आले आहे.

नळ योजना संपूर्ण शहरांमध्ये अजूनही पूर्णपणे झालेली नाही. अगदी सुरुवातीलाच नळ योजनेचे तीन तेरा वाजत आहेत तर भविष्यात ही नळ योजना किती यशस्वी होईल यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.