
भंडारा, ५ जून (हिं.स.) – काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी यांनी ओबीसींच्या नावाखाली नोटंकी केली आहेत. तर नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांना विचारा की ओबिसिचे खरे मारेकरी कोण आहेत ते असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. त्यावर उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, भाजपाने ओबीसींची मते घेतली मात्र ओबीसींसाठी काय केल याच उत्तर भाजपाने द्यावे. जातीनिहाय जनगणनेचा जो घोळ निर्माण झाला आहे. यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे का मूग गिळून आहेत. ओबीसींचे मारेकरी आम्ही नव्हे तर भाजपा असून त्यामुळे भाजपा. नेत्यांनी ओबीसींबद्दल मगरमच्छचे आसू रडू नये असा प्रत्युत्तर नाना पटोले यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना दिला आहे. तर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्या कार्यकत्यांनी नाना पटोले यांनी लाडू तुला केली आहे. नाना पटोले भावी मुख्यमंत्री असे घोषणा देत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.