Bhandara: जिल्हा सामान्य रुग्णालयाला गळती रुग्णांनी रात्र काढली जागून

0

Bhandara hospital in water भंडारा (Bhandara), 28 जुलै जिल्हा सामान्य रुग्णालयाला गळती लागली असुन रुग्णांच्या नातेवाईकांनी संपुर्ण रात्र जागून काढली आहे. त्यामुळे निकृष्ट बांधकामाचा फटका सर्वसामान्य नागरिकाना बसला आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय सर्व सामान्य नागरिकांचा आधार आहे. भंडारा, गोंदिया, तसेच जवळ असलेल्या मध्यप्रदेश येथिल रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. दररोज 10 हजाराची ओपिडी या रुग्णालयात आहेत. तर 2018 मध्ये नवीन इमारत बांधकाम करण्यात आली. कोरोना काळात या इमारतीला कोरोणा इमारत म्हणुन रुग्ण ठेवण्यात आले होते. तर आता जनरल, आयसीयू वार्ड याच इमारतीत आहेत. जिल्ह्यात रात्रभर दमदार पाऊस बरसला याच पावसामुळे रुग्णालयाची नवनिर्मित इमारत गळू लागली. रुग्णाच्या बेड वर तसेच वरांड्यात पाणी साचले होतें. रुग्णाच्या नातेवाईकांनी अख्खी रात्र जागून काढली असुन नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.

तर ही इमारत नवनिर्मित असुन देखिल गळती लागली आहे. ज्या कंत्राटदारांनी निकृष्ट बांधकाम केलं अशा कंत्राटदारावर कारवाही करायला पाहिजे पण जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासन कर्वाहीच्या नावाखाली सारवासारव करित आहे. स्थानीक आमदार भोंडेकर यांनी या रूग्णालय गळती प्रकरणात चौकशी केली जाईल व दोषी कांत्राटदाराला ब्लॅक लिस्टेड केलं जाणार असल्याचे सांगितले आहे.

कोट्यवधी रूपये खर्च करून नवीन इमारत बांधकाम करण्यात आली. पण बांधकाम विभागाच्या ढिसाळ नियोजामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता या प्रकरणात खरोखर चौकशी केली जाते, हे प्रकरण देखिल दाबल्या जाईल, अधिकारी व कंत्राटदार दोषी असुन देखिल चौकशीच्या नावाखाली वेळकाढू पना होणार का हे पाहावं लागेल…..?