भरतनाट्यममधून प्रकटला भक्‍ती-भाव

0

नागपूर(Nagpur), 23 मे 2024 देवरावजी कुबडे सेवा प्रतिष्ठान नागपूर आयोजित वारकरी अभंगावर आधारित भरतनाट्यम नृत्य भक्तीचा कार्यक्रम ‘वैकुंठनायक’ ने बुधवारी रसिकांना मंत्रमुग्‍ध केले. साई सभागृहात झालेल्‍या या कार्यक्रमात नागपुरातील प्रसिद्ध 30 भरतनाट्यम नृत्य कलावंतांनी लय, ताल आणि भाव यांचा अद्भूत संगम सादर केला.

कार्यक्रमाला बालरंगभूमी परिषदेच्‍या अध्‍यक्ष आभा मेघे, स्‍वप्‍नपूर्ती कला केंद्राचे अध्‍यक्ष मदन पांडे, नुपूर नृत्‍य निकेतनच्‍या संचालिका सूचना बंगाले, अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे कार्यकारी सदस्‍य संजय रहाटे, वनराई फाउंडेशनचे सचिव निलेश खांडेकर तसेच, रशुद्दी बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थेच्‍या सुनीता गजभिये, रंगभूमीचे अमित कुबडे, प्रदूषण नियंत्रण नागरिक स्वास्थ संवर्धन संस्थेचे धनराज मोटे, रुखमाई सेवा मंडळाचे विलास कुबडे, निलशोभा बहुउद्देशीय संस्थेचे नितीन पात्रीकर, देवरंजन बहुउद्देशीय संस्थेचे प्रवीण देशकर व तांडव क्रिएशनचे किशोर बत्तासे यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती. यावेळी हभप श्री नानाजी गिरसावळे महाराज यांचा वारकरी क्षेत्रातील योगदानाबद्दल मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

या कार्यक्रर्माचे नृत्य दिग्दर्शन सतीश बगडे यांनी केले होते तर आयोजन शामला कुबडे यांचे होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन समृद्धी कळाशिकर यांनी केले.