

बीड- शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी परतीच्या मार्गावर आहे. बीड जवळील श्री क्षेत्र कपिलधार येथे मुक्कामी राहिल्यानंतर आज ही पालखी मार्गस्थ होत आहे. हाती भगवी पताका घेऊन गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन बीड जिल्ह्यात झाले. विठू नामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालात पालखी सोहळा उत्साहात दिसून आला. आज बीड शहरातील कंकालेश्वर मंदिरात पालखी मुक्कामी थांबून उद्या गेवराईकडे प्रस्थान करणार आहे. बीड येथील भाविकांना पालखी परतीच्या मार्गावर असताना दर्शनाची संधी मिळावी, म्हणून विठ्ठल मंदिर संस्थानाचे पांडुरंग महाराज पुजारी यांनी संस्थांचे तत्कालीन अध्यक्ष गोपाळ पाटील यांना विनंती केली. तेव्हापासून पालखीचा बीड येथे विठ्ठल मंदिरात मुक्काम सुरू झाला. ही 51 वर्षांची परंपरा आहे.