Crime : चोरीचा माल घेत असाल तर सावधान!

0

लासलगाव (Lasalgaon), 16 जुलै सराईत गुन्हेगार व गुन्ह्यातील माल घेणाऱ्याला निफाडच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी शिक्षा ठोठावली असून यामुळे गुन्ह्यातील माल खरेदी करणारांना चांगलीच अद्दल घडली आहे.

दि.१६ फेब्रु. ते १७ फेब्रु.२०१७ दरम्यान सायखेडा बाजार समिती व्यापारी गाळा मालक फिर्यादी यांचे दुकानातुन अज्ञात आरोपींनी २,८६,०८१ रुपयांचे एम.आर.एफ कंपनीचे १०५ टायर्स, संगणक, टीव्ही संच असा मुद्देमाल घरफोडी करुन चोरुन नेला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक उपासे व त्यानंतर पोलिस निरीक्षक मोरे यांनी अत्यंत कसोशीने सदर गुन्ह्याचा तपास करून उघडकीस आणला. त्यात आरोपी अशरफ हमीद शेख, फैय्याज अल्लाउदीन अन्सारी, साजिद अन्वर पटेल, गफार मुक्तार सैय्यद रा.जेलरोड नाशिक यांचा या चोरीत सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना व आरोपी जावेद अहमद मोहमद अन्सारी रा.लालानगर मालेगांव याने सदरहू माल खरेदी केल्याने सदरहू गुन्ह्यात भा.द.वि.कलम ४११ असे वाढीव कलम लावण्यात येऊन त्यालाही अटक करण्यात आली. त्याच्याकडून गेलेल्या मालापैकी ७२,५०० रु.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदर गुन्ह्यातील आरोपीं विरोधात निफाड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येऊन लोकसभा निवडणुक काळात अशरफ हमीद शेख यांस सायखेडा पोलिसांनी अटक करून त्याचे विरुद्दपुरवणी दोषारोप सादर करण्यात आले होते. सदर खटल्याची अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मा.जे.व्ही.भेंडे साहेब यांचे न्यायालयात सुनावणी होऊन चोरी करणाऱ्या तीन आरोपींना ३ वर्ष सक्तमजुरी व २०० रुपये द्रव्यदंड व न भरल्यास १५ दिवस कारावास तसेच चोरीचा माल घेणारा आरोपी जावेद अहमद मोहमद अन्सारी यास ६ महिने सक्तमजुरी व २०० रुपये द्रव्यदंड व न भरल्यास ५ दिवस कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता मनोज तोरणे यांनी कामकाज पाहिले.

 

जब किसी का सामान चोरी हो जाता है तो क्या-क्या करना चाहिए
ऐसी कौन सी चोरी है जो सबकी फेवरेट होती है
चोर का नाम जानना
चोरी हुए सामान का पता लगाना
खोई हुई वस्तु मिलेगी या नहीं
चोरी का सामान वापस प्राप्त करने का उपाय
घर के चोर को कैसे पकड़े
चोरी करना पाप है