नागपूर : शरद पवारांची उंची खूप आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची उंची कमी आहे. यामुळे त्यांच्या पदाला शोभेल अशीच वक्तव्ये करायला पाहिजे या शब्दात माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आज सुनावले. देशमुख म्हणाले, आमचा ओरिजिनल एनसीपी पक्ष आहे. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला बावनकुळे यांनी अक्कल शिकवण्याची गरज नाही. आमच्यापासून अनेक नेते दूर गेले, ते शरद पवारांना दैवत मानतात. पण शरद पवारांनी सूचना केली होती, माझ्या फोटोचा वापर करू नये. त्याचे पालन आता त्यांनी केले पाहिजे. चंद्रयान-3 यशस्वी झाले, आम्हाला सर्वाना इस्रोच्या कामगिरीचा अभिमान आहे. इस्रोची स्थापना प.नेहरूंनी दूरदृष्टी ठेवून केली. आजच्या सरकारचे यात योगदान आहे, हे नाकारता येत नाही. पण नेहरूंचे स्मरण देखील करणे गरजेचे आहे.
शरद पवार यांना बावनकुळेंनी अक्कल शिकवू नये -अनिल देशमुख
Breaking news
MAHARASHTRA
MAHARASHTRA















