

नागपूर (Nagpur): 14 कोटी जनतेचे सर्वेक्षण केले तर आजही लोकांच्या मनात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचेच नाव असेल, दुसऱ्या सर्वेक्षणात नालायक लोकांमध्ये सगळ्यात टॉपवर उद्धव ठाकरे असतील अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी माध्यमांशी कोराडी येथे बोलताना केली. गेले दोन दिवस उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असताना आता बावनकुळे फडणवीस यांच्या मदतीला आले आहेत.
उद्धव ठाकरेंची लोकप्रियता कमी झाली आहे.कोणीही सभा घ्यायला तयार नाहीत.त्यांच्या सभेला लोक यायला तयार नाहीत.उद्धव ठाकरे यानाही माहिती आहे की या लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत.18 खासदार मोदींच्या नेतृत्वात 2019 मध्ये निवडून आले. आता उद्धव ठाकरे यांचे खासदार दिसणार नाहीत त्यामुळे त्यांना भीती वाटू लागली आहे. मुळात जनतेसमोरं ज्या गोष्टी निरर्थक आहेत.महाराष्ट्राची गरज नाही.महाराष्ट्र अपेक्षित करत नाही .टोमणे मारणे खरं तर कोणीही या बाबींना लक्ष देत नाही.जनतेला विकास पाहिजे शेतकरी, शेतमजूर क्षेत्राला काम पाहिजे शेतमालाला भाव हवा आहे.सोयाबीन कापसाचे प्रश्न सुटले पाहिजे,.धानाचे प्रश्न सुटले पाहिजे. हमीभाव मिळाला पाहिजे.
जाणता राजा कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी कधी शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. मोदीं यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभे केले. अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले.सरकार मजबूतपणे शेतकऱ्यांचा मागे उभे आहे.आज शेतकरी प्रश्न आठवत असताना सर्वात जास्त शरद पवार यांनी शेतकऱ्यांना वर अन्याय केला असा आरोप बावनकुळे यांनी केला. मुळात शेतकऱ्यांचा पुळका आता तुम्ही दाखवू नका असा इशारा दिला.