बापरे! 600 षटकारांचा विक्रम

0

नवी दिल्ली (New Delhi) 6 जून :- काल झालेल्या आयसीसी(ICC) टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup)स्पर्धेत भारतीय संघाने आयर्लंडला पराभूत करत विजय मिळवला. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा विजयाचा हिरो ठरला. रोहितने या सामन्यात 52 धावांची खेळी केली.

या खेळीदरम्यान रोहितने 37 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार मारत मोठा विश्वविक्रम केला आहे. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. रोहितने 473 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 499 डावात 600 षटकार पूर्ण केले.रोहितनंतर या यादीत दुसऱ्या स्थानी वेस्ट इंडिजचा(West Indies) माजी फलंदाज ख्रिस गेल विराजमान आहे. गेलने 483 सामन्यांमधील 551 डावात 553 षटकार मारले आहेत.तसेच टी 20 वर्ल्ड कपमध्येही 1000 धावा करणारा रोहित शर्मा(Rohit Sharma) हा तिसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम विराट कोहली आणि माहेला जयवर्धने यांनी केला आहे.