(Sangli )सांगली : केवळ मौजमजेसाठी आणि दुचाकीवरील गतीचा आनंद लुटण्यासाठी मिरजेत दोन मोपेड चोरण्याचा प्रकार अल्पवयीन मुलांनी केल्याचे सोमवारी उघडकीस आले. या प्रकरणी दोन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या दोन मोपेड हस्तगत करण्यात आल्या आहेत.
(City Police Station Assistant Police Inspector Vikram Patil)शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील हे गस्त घालत असताना दोन लहान मुले मोपेडवरून फेरफटका मारत असल्याने संशय आला. त्यांच्याकडे एक विनाक्रमांकाची व एक नोंदणीकृत (एमएच १० इडी ५१४१) ही दोन वाहने होती. या वाहनाच्या कागदपत्राबाबत चौकशी केली असता त्यांना काहीही सांगता आले नाही. मात्र, एकंदरितच त्यांच्या वागण्यावरून संशय बळावल्याने पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी या मोपेड शहराच्या विविध भागांतून चोरी केल्याची कबुली दिली. केवळ मौज आणि गतीचा आनंद लुटण्यासाठी या मोपेडची चोरी केल्याचे त्यांनी सांगितले.

















